Saturday, September 24, 2011

खऱ्या अर्थाने सहकार महर्षी

            सहकार क्षेत्र म्हणजे खर्या अर्थाने जनसेवा करण्याचा हे क्षेत्र पण दुर्दैवाने समाजातली इतर सामाजिक क्षेत्र भ्रष्टाचाराने पोखरली गेली तसाच हे देखील त्याच प्रवाहात जातंय. बरीच नेतेमंडळी सहकारी बँकांवर त्याच्या राजकीय ताकदीवर वर्चस्व मिळवतात आणि त्याचा उपयोग त्यांच्या स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठीच करतात आणि ह्याचमुळे सहकार क्षेत्र डळमळीत होताना दिसतंय. गोरेगाव अर्बन बँक आणि रोहा अष्टमी बँक ह्या बँकानंतर रायगडच्या सहकार क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला तो म्हणजे रायगड जिल्ह्यातली महत्त्वाची बँक "पेण अर्बन बँक" ह्या बँकेवर RBI ने निर्बंध लादले आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातले बरेच व्यवहार ठप्प झाले. राजकीय चिखलफेक चालू झाली, सर्वचजण बँक का बुडाली कोणी बुडवली अशा चर्चा करत होते पण ते चालू असतानाच, बँक कशी वाचवावी असा विचार करणारा एक नेता होता आणि ते म्हणजे शेकापचे आमदार रायगड जिल्हा बँकेचे चेअरमन भाई जयंत पाटील. पेण अर्बन बँक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिपत्त्याखालील बँक अशा वेळेला इतर विरोधी पक्षांनी राजकीय हल्लाबोल चालू केला अर्थात त्यात त्यांचाच स्वार्थ होता असे म्हणणे चुकीचे आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या म्हणून सगळेच राजकीय नेते संघर्ष करत होते आणि करत आहेत पण जयंत भाई सारख्या नेत्याने मात्र ठेवीदारांच्या ठेवी तर परत मिळायलाच पाहिजेत पण बँकसुद्धा पुन्हा सुरु व्हायला पाहिजे असे प्रयत्न सुरु केले, कारण सहकार क्षेत्रासाठी हा धक्का पचवणे सोपे नाही. 
            काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेणमधील पाटणेश्वर  अर्बन बँकसुद्धा बंद होईल अशा वावड्या पसरवायला सुरुवात केली. पाटणेश्वर बँक हि कॉंग्रेसचे माजी मंत्री रवी पाटील ह्यांची बँक. कॉंग्रेस हा शेकापचा क्रमांक एकचा शत्रू असून सुद्धा जयंत भाईनी त्या बँकेची पाठराखण केली. जयंत भाईंच्या अधिपत्याखाली असलेली रायगड बँक तर मोठ-मोठी शिखरे पार करीत आहे आणि पेण अर्बन सुरु केल्याशिवाय जयंत भाई गप्पं बसणार नाहीत हे पण तेवढंच खर. आता तुम्हीच सांगा कोण आहे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी ................