Friday, June 10, 2011

राष्ट्रवादीचे जातीय राजकारण

              सामाजिक परिवर्तनाची सनद मांडण्याची राष्ट्रवादीसारख्या पक्षाला गरजच काय, सलग ११ वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता उपभोगणाऱ्या पक्षाला अशा प्रकारच्या सनदी मांडून फक्त दलित वोटबँकेला आकर्षित करायचं एवढंच. स्वतःला सेक्युलर म्हणवत आतापर्यंत सगळ्यात जास्त जातीचं राजकारण राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हेच पक्ष करत आलेत. रामदास आठवले so called शिवशक्तीमध्ये सामील झाल्याने आपली दलित वोटबँक दूर जाते कि काय अशी भीती वाटू लागल्याने राष्ट्रवादीने आता अशी पावले उचलली आहेत. आम्ही जनतेला आवाहन करतो कि आता तुम्हीच जातीयवादी पक्ष कोण ते ओळखा आणि योग्य तो निर्णय घ्या. 
             शेकापच्या बाबतीत असे आरोप करणे आतापर्यंत कोणालाही शक्य झालेलं नाही आणि कोणी करूही शकत नाही कारण शेकाप हा कोणतेही जाती-धर्मभेद न मानता गरीब आणि शेतकरी तसेच सामान्य माणसासाठी झटणारा पक्ष आहे. 

Monday, June 6, 2011

शेकापच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढावे- सरचिटणीस जयंत पाटील

                       काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचे आगर झाले आहे. गावपातळीपासून ते मंत्रालय पातळीपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविरुद्ध बोलण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार केवळ शेकापला आहे. कारण शेकाप हा नाही रे वर्गासाठी काम करणारा तत्त्वनिष्ठ पक्ष आहे. त्यामुळे युवकार्याकार्त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन हाती घ्यावे, असा आदेश सरचिटणीस जयंत पाटील ह्यांनी दिला .    

Sunday, June 5, 2011

रामदेव बाबांचे आंदोलन दडपण्याचा प्रकार निन्दनीय आणि अशोभनियच

                   रामदेव बाबा काय आहेत कसे आहेत किंवा त्यांचा खरा हेतू काय होता आंदोलन करण्याचा , ह्याला कितीही कारणे किंवा उत्तरे असली तरी अशाप्रकारे मध्यरात्र उलटून गेल्यावर आंदोलन उध्वस्त करणे हि सरकारसाठी शरमेची बाब आहे. रामदेव बाबांच्या नीती आणि चारित्र्याबद्दल कितीही शंका कुशंका उपस्थित केल्या असल्यातरी ह्या आंदोलनामध्ये अनेक निरपराध स्त्रिया, मुले, पुरुष सहभागी झाले होते आणि तरीही सरकारने रात्री १-३० च्या सुमारास हे आंदोलन उध्वस्त केले , ह्यावेळी पोलिसांनी व्यासपीठ सुद्धा जाळून टाकण्याचा अशोभनीय प्रकार केला आहे. ह्या अशा प्रकारच्या लोकशाहीला शोभा न देणाऱ्या कृत्त्याचा आम्ही निषेध करतो..........