Saturday, September 24, 2011

खऱ्या अर्थाने सहकार महर्षी

            सहकार क्षेत्र म्हणजे खर्या अर्थाने जनसेवा करण्याचा हे क्षेत्र पण दुर्दैवाने समाजातली इतर सामाजिक क्षेत्र भ्रष्टाचाराने पोखरली गेली तसाच हे देखील त्याच प्रवाहात जातंय. बरीच नेतेमंडळी सहकारी बँकांवर त्याच्या राजकीय ताकदीवर वर्चस्व मिळवतात आणि त्याचा उपयोग त्यांच्या स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठीच करतात आणि ह्याचमुळे सहकार क्षेत्र डळमळीत होताना दिसतंय. गोरेगाव अर्बन बँक आणि रोहा अष्टमी बँक ह्या बँकानंतर रायगडच्या सहकार क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला तो म्हणजे रायगड जिल्ह्यातली महत्त्वाची बँक "पेण अर्बन बँक" ह्या बँकेवर RBI ने निर्बंध लादले आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातले बरेच व्यवहार ठप्प झाले. राजकीय चिखलफेक चालू झाली, सर्वचजण बँक का बुडाली कोणी बुडवली अशा चर्चा करत होते पण ते चालू असतानाच, बँक कशी वाचवावी असा विचार करणारा एक नेता होता आणि ते म्हणजे शेकापचे आमदार रायगड जिल्हा बँकेचे चेअरमन भाई जयंत पाटील. पेण अर्बन बँक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिपत्त्याखालील बँक अशा वेळेला इतर विरोधी पक्षांनी राजकीय हल्लाबोल चालू केला अर्थात त्यात त्यांचाच स्वार्थ होता असे म्हणणे चुकीचे आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या म्हणून सगळेच राजकीय नेते संघर्ष करत होते आणि करत आहेत पण जयंत भाई सारख्या नेत्याने मात्र ठेवीदारांच्या ठेवी तर परत मिळायलाच पाहिजेत पण बँकसुद्धा पुन्हा सुरु व्हायला पाहिजे असे प्रयत्न सुरु केले, कारण सहकार क्षेत्रासाठी हा धक्का पचवणे सोपे नाही. 
            काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेणमधील पाटणेश्वर  अर्बन बँकसुद्धा बंद होईल अशा वावड्या पसरवायला सुरुवात केली. पाटणेश्वर बँक हि कॉंग्रेसचे माजी मंत्री रवी पाटील ह्यांची बँक. कॉंग्रेस हा शेकापचा क्रमांक एकचा शत्रू असून सुद्धा जयंत भाईनी त्या बँकेची पाठराखण केली. जयंत भाईंच्या अधिपत्याखाली असलेली रायगड बँक तर मोठ-मोठी शिखरे पार करीत आहे आणि पेण अर्बन सुरु केल्याशिवाय जयंत भाई गप्पं बसणार नाहीत हे पण तेवढंच खर. आता तुम्हीच सांगा कोण आहे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी ................     

Sunday, July 31, 2011

शेकाप , आमदार आणि विधिमंडळ

             शेतकरी कामगार पक्ष संपला, पक्षाचे बालेकिल्ले ढासळले, जिल्हापातळीवरील पक्ष अशा अनेक प्रकारच्या टीका पक्षावर करण्यात आल्या, पण तरीही पक्षांनी आपली मुल तत्त्वे न सोडता आपले काम चालूच ठवले. एक काळ होता जेन्वा विधानसभेत पक्षाचे ४० च्या आसपास आमदार होते आता ते ४ आहेत मधल्या काळात ती संख्या २ वर गेली होती. पण तरीही पुन्हा एकदा जोरदार झुंज देत पक्षाने आपल्या आमदारांची संख्या वाढवायला सुरुवात केली आणि काहीअंशी त्यात यश सुद्धा आले.
             आज पक्षाचे विधान सभेत फक्त ४ आमदार आहेत पण ४० आमदार जेवढं काम करतील तेवढं काम हे ४ आमदार करतात. हे सगळा करताना आपल्या पक्षाच्या चौकटीत राहून हे आमदार गरीब, कष्टकरी, कामगार तसेच सामान्य माणसांचे प्रश्न विधानसभेत मांडतात, आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न अभ्यासपूर्ण तसेच आक्रमकपणे विधानसभेत मांडून जनहिताची कामे हे आमदार करतात.
विधानसभेत ज्येष्ठ आमदार भाई गणपतराव देशमुख, भाई विवेक पाटील, भाई धैर्यशील पाटील तसेच मीनाक्षीताई पाटील सभागृह गाजवतात तर वरिष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेत आपले सरचिटणीस हे एकमेव आमदार आहेत पण तरीही जयंत पाटील हे नाव आणि त्यांचे काम संपूर्ण सभागृहाला माहित आहे.
               आज विधान भवनामध्य शेकापचे विधान सभेतील ४ आणि परिषदेतील १ असे एकूण ५ आमदार आहेत. पुढे हि संख्या वाढत जाओ आणि शेकापक्ष दीर्घायुषी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

Friday, June 10, 2011

राष्ट्रवादीचे जातीय राजकारण

              सामाजिक परिवर्तनाची सनद मांडण्याची राष्ट्रवादीसारख्या पक्षाला गरजच काय, सलग ११ वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता उपभोगणाऱ्या पक्षाला अशा प्रकारच्या सनदी मांडून फक्त दलित वोटबँकेला आकर्षित करायचं एवढंच. स्वतःला सेक्युलर म्हणवत आतापर्यंत सगळ्यात जास्त जातीचं राजकारण राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हेच पक्ष करत आलेत. रामदास आठवले so called शिवशक्तीमध्ये सामील झाल्याने आपली दलित वोटबँक दूर जाते कि काय अशी भीती वाटू लागल्याने राष्ट्रवादीने आता अशी पावले उचलली आहेत. आम्ही जनतेला आवाहन करतो कि आता तुम्हीच जातीयवादी पक्ष कोण ते ओळखा आणि योग्य तो निर्णय घ्या. 
             शेकापच्या बाबतीत असे आरोप करणे आतापर्यंत कोणालाही शक्य झालेलं नाही आणि कोणी करूही शकत नाही कारण शेकाप हा कोणतेही जाती-धर्मभेद न मानता गरीब आणि शेतकरी तसेच सामान्य माणसासाठी झटणारा पक्ष आहे. 

Monday, June 6, 2011

शेकापच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढावे- सरचिटणीस जयंत पाटील

                       काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचे आगर झाले आहे. गावपातळीपासून ते मंत्रालय पातळीपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविरुद्ध बोलण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार केवळ शेकापला आहे. कारण शेकाप हा नाही रे वर्गासाठी काम करणारा तत्त्वनिष्ठ पक्ष आहे. त्यामुळे युवकार्याकार्त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन हाती घ्यावे, असा आदेश सरचिटणीस जयंत पाटील ह्यांनी दिला .    

Sunday, June 5, 2011

रामदेव बाबांचे आंदोलन दडपण्याचा प्रकार निन्दनीय आणि अशोभनियच

                   रामदेव बाबा काय आहेत कसे आहेत किंवा त्यांचा खरा हेतू काय होता आंदोलन करण्याचा , ह्याला कितीही कारणे किंवा उत्तरे असली तरी अशाप्रकारे मध्यरात्र उलटून गेल्यावर आंदोलन उध्वस्त करणे हि सरकारसाठी शरमेची बाब आहे. रामदेव बाबांच्या नीती आणि चारित्र्याबद्दल कितीही शंका कुशंका उपस्थित केल्या असल्यातरी ह्या आंदोलनामध्ये अनेक निरपराध स्त्रिया, मुले, पुरुष सहभागी झाले होते आणि तरीही सरकारने रात्री १-३० च्या सुमारास हे आंदोलन उध्वस्त केले , ह्यावेळी पोलिसांनी व्यासपीठ सुद्धा जाळून टाकण्याचा अशोभनीय प्रकार केला आहे. ह्या अशा प्रकारच्या लोकशाहीला शोभा न देणाऱ्या कृत्त्याचा आम्ही निषेध करतो..........

Wednesday, May 25, 2011

तरुण, तडफदार, अभ्यासू, सय्यमी युवानेते मा. आमदार धैर्यशील पाटील

              "धैर्यशील पाटील" हे नाव ऐकताच आठवतो तो "सेझ" विरुद्धचा शेतकऱ्यांचा सातत्यपूर्ण लढा. सेझ विरुद्ध लढण्यासाठी  पेण खारेपाटातील शेतकऱ्यांना गरज होती सक्षम नेतृत्त्वाची आणि ह्याचवेळी एक नवीन नेतृत्त्व निर्माण झालं ते म्हणजे शेकापचे युवानेते धैर्यशील पाटील. कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता डॉ. एन डी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील दादा आंदोलनात उतरले एक मोठी चळवळ दादांनी उभी केली आणि सेझला हद्दपार केले. त्यानंतर काही काळातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि ज्येष्ठ नेते भाई मोहन पाटलांनी युवा नेतृत्त्वाकडे जबाबदारी सोपवण्याचे जाहीर केले आणि शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. धैर्यशील पाटलांसमोर आव्हान होते कॉंग्रेसचे कॅबिनेट मंत्री रवी पाटील आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे ह्यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरेंचे एवढ्यामोठ्या धनशक्ती समोर उभ्या असताना दादा गडबडले नाही आणि शेवटी निकालाचा दिवस आला "जनशक्ती विरुद्ध  धनशक्ती" ह्या लढतीत जनशक्तीचा विजय झाला. कॉंग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याचा पराभव करून शेकापचे युवानेते धैर्याशिलदादा पाटील बहुमतांनी विजयी झाले.
                      विधानसभेत पोहोचलं तरुण, तडफदार, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आमदार धैर्यशील पाटील, पहिल्याच अधिवेशनात आपल्या कर्तृत्त्वाची झलक त्यांनी संपूर्ण सभागृहाला दाखवली, प्रथमच निवडून आलेल्या आमदारांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या पहिल्या ३ आमदारांमध्ये दादांचे नाव आले आणि पेणकरांच्या मनात दादांबद्दल असलेला अभिमान अधिकच वाढला आपली निवड चुकली नाही ह्याचे समाधान पेणकरांना वाटू लागले.
वक्तृत्त्व हि दादांची जमेची बाजू, अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विशेष शैलीमध्ये ते भाषण करतात आणि समोरचा माणूस किंवा कार्यकर्ता सर्वकाही विसरून त्यांचं भाषण ऐकत असतो.
                  पेणमधील पेण अर्बन बँकेचा प्रश्न असो व खारबंदिस्तीचा प्रश्न असो दादांनी रस्तावर उतरून तसेच विधान सभेत अशा अनेक प्रश्नांवर लढा दिला आणि अजून देत आहेत. गणपती कारखानदारांचा प्रश्न असो पेण शहर तसेच ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न, हेटवणे धरण सिंचन प्रकल्प अशा अनेक समस्या दादांनी कोणताही पक्षभेद न मानता विधानसभेत मांडल्या आहेत. पेणकरांचा भाग्य म्हणून असा लोकप्रतिनिधी पेणला लाभला. 
                 दादांच्या भावी कामगिरीसाठी शुभेच्छा.......


-प्रभाकर प्रकाश शिंगरुत             

अभ्यासू, आक्रमक, तडफदार नेतृत्त्व मा. जयंतभाई पाटील

नाशिक येथे झालेलं शेकापच ते अधिवेशन, नेतृत्त्व बदल होणार ह्याची कल्पना कोणालाच नव्हती आणि अचानक वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला आणि पक्षाची सूत्रे तरुण उमद नेतृत्त्व पक्षाचे विधान परिषदेतील आमदार पक्षाचे नेते माननीय जयंत पाटील ह्यांचाकडे सोपवण्यात आली आणि सुरु झालं ते एक नवीन पर्व. शेकापच नेतृत्त्व एका मध्यम वयाच्या अभ्यासू परंतु तेवढेच आक्रमक असणाऱ्या नेत्याकडे सोपवण्यात आले अर्थात त्यांचा निवडीला विरोध हा झाला पण तो क्षणिक होता लवकरच जयंतभाईंचे नेतृत्त्व सर्व कार्यकर्ते तसेच नेत्यांना मान्य झाले .
त्यानंतर पक्षाच चित्रच हळूहळू बदलायला लागलं 'वृद्धांचा पक्ष' अशी काही लोकांकडून झालेली टीका मोडीत काढत पक्षाकडे येणारा तरुण वर्ग वाढत गेला.शेकापमधून बाहेर गेलेले कार्यकर्ते तसेच इतर सर्वच वर्गातील नागरिक शेकापवर विश्वास ठेऊन पक्षात येऊ लागले आणि त्याचाच प्रत्यय ७ मार्च २०११ रोजी झालेल्या मोर्चात आला, न भूतो न भविष्याती असा हा मोर्चा झाला. शेकाप संपला असा म्हणणार्यांना चोख उत्तर ह्या मोर्चातून मिळाले. भाजप तसेच इतर मोठ्या पक्षांचा मोर्चा होऊन पण सरकारनी त्यांची दाखल घेतली नाही पण शेकापच्या मोर्चाची दाखल शासनाला घ्यावी लागली आणि म्हणून सरकारतर्फे पतंगराव कदम ह्यांनी मोर्चास्थळी येऊन आंदोलकांना संबोधित केले. 
रायगड जिल्हा परिषदेचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर पाटील ह्यांचे जयंत पाटील हे ज्येष्ठ पुत्र. वयाचा १८व्या वर्षी अलिबाग पंचायत समितीवर जयंतभाई निवडून आले.आणि पुढे त्यांची हि घोडदौड अशीच चालू राहिली आणि फक्त २ आमदार विधानसभेवर असताना ३१ मते मिळून जयंतभाई विधान परिषदेवर निवडून आले . 
सहकार क्षेत्रातील जयंतभाईंची कामगिरी उल्लेखनीय आहे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक संकटात असताना(जवळपास १९९० च्या काळात ) जयंत भाईंची बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली आणि बँकेने गरुड झेप घेतली आणि आता महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अग्रणीची जिल्हा बँक म्हणून बँकेकडे बघितलं जाते नुकतंच बँकेने ५० व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि इतर सहकारी बॅंका डळमळीत झालेल्या असताना रा. जी. बँक मात्र मजबूत स्थितीत आहे.
रायगड जिल्ह्यातील शेकापच्या यशाचे शिल्पकार असणारे जयंतभाई महाराष्ट्रात सुद्धा शेकापचे गतवैभव परत आणतील अशी अपेक्षा नाही तर खात्री आहे........

  प्रभाकर प्रकाश शिंगरूत